* शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
* कृषी विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग यशस्वी
वणी – कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने गत 4 – 5 वर्षांपासून कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. यावर ‘ट्रायकोग्रामा’ हाच एकमेव रामबाण उपाय असल्याचे शुभम पिंपळकर व गणेश हटवार ह्या मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.
एक जीव दुसऱ्या जिवावर जगतो, या तत्त्वावर जैविक कीड नियंत्रण पद्धत आधारित आहे. अनेक किडीच्या अंड्यांवर उपजीविका करणारा ट्रायकोग्रामा चिलोनीस हा मित्र कीटक 200 प्रकारच्या किडींच्या अंड्यावर उपजीविका करतो. पतंगवर्गीय किडींच्या अंड्यांमध्ये ट्रायकोग्रामा आपली अंडी घालून त्या किडींचा अंडी अवस्थेतच नाश करतो. त्यामुळे ट्रायकोग्रामा कीड नियंत्रणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. ट्रायकोग्रामाचा प्रयोग राबवून शेतकऱ्यांना बोंड अळीपासून मोठ्या प्रमाणात मुक्तता मिळत असल्याने ट्रायकोकाई किटक हे बोंडअळीवर रामबाण उपाय ठरतो आहे.
कृषी महाविद्यालयाचे विध्यार्थी शुभम पिंपळकर व गणेश हटवार हे विद्यार्थी तालुक्यातील अनेक शेतात हा प्रयोग करीत आहेत. पिकाचे आरोग्य हे कृषी क्षेत्रासमोर आव्हान आहे. यावर आता जैविक पद्धतच एकमेव उपाय असल्याचे कृषी संशोधकांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ‘ट्रायकोग्रामा’ किडीच्या अंड्यावर उपजीविका करतो. त्यामुळे किडींचा अंडी अवस्थेतच नाश होतो . ट्रायकोग्रामा स्वतःच अशा किडींच्या अंड्याचा शोध घेऊन त्याचा नाश करतो. 3 ते 4 वर्षे सातत्याने ट्रायकोग्रामा सोडल्यास त्या क्षेत्रात त्याची प्रचंड संख्या वाढते. त्यामुळे किडींचा नाश होतो तसेच कीटकनाशकावर होणारा खर्च कमी होतो. याबाबत हे विद्यार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताहेत