Home वणी परिसर फॉर्मलॅब्जच्या कार्यक्रमाला कुंभा येथील शेतकरी

फॉर्मलॅब्जच्या कार्यक्रमाला कुंभा येथील शेतकरी

* सरपंच अरविंद ठाकरे यांचा पुढाकार

वणी- ग्रामीण परिसरातील शेतकऱ्यांना जैविक व सेंद्रिय पद्धतीने शेती जमिनीची पोत,जमिनीची गुणवत्ता आणि कमी खर्चात उत्पादकता वाढविण्यासाठी विविध तंत्रज्ञान  आत्मसात व्हावे याकरिता फॉर्मलॅब्जच्या वतीने यवतमाळला शेतबांधावरील प्रयोगशाळा पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कुंभा परिसरातील 30 ते 35 शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.

शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या करिता फॉर्मलॅब्जच्या वतीने शेतबांधावरील प्रयोगशाळा पाहणी कार्यक्रम राबविला. यासाठी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांनी कुंभा, दहेगाव, टाकळी, महागाव,सिंधी परिसरातील शेतकऱ्यांना ने आन करण्याची सर्व जबाबदारी उचलत कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

“कुंभा व परिसरकरिता मिळणार रुग्णवाहिका” सरपंच अरविंद ठाकरे यांचे निकटवर्तीय मनोज साकला यांची या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांसोबत भेट झाली. या प्रसंगी साकला यांनी कुंभा व परिसरातील नागरिकांच्या सेवेकरिता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रुग्णवाहिका भेट देण्याचे अभिवचन दिले. 

Img 20250103 Wa0009

यावेळी उपसरपंच गजानन ठाकरे, प्रेमकुमार खुराणा, अजय भन्साळी, संदीप डुकरे, मुकेश महाडुळे, मोतीराम पडोळे, मयूर ठाकरे, मारोती मुप्पीडवार, संजय तामगाडगे, विनोद ठाकरे, विनोद गाऊत्रे, अनंता महाजन, प्रवीण डाहुले, लखन राऊत, विनोद चौधरी, नाना सोनूले, अमोल वणकर, बबनराव गोखरे, पांडुरंगआसुटकार, रमेश पा.आसुटकर, रामचंद्र महाडुळे, रवी पा.पिंपळकर विविध मान्यवर हजर होते.