Home वणी परिसर झरीजामणी तालुक्यातील विद्यार्थी पुस्तकाविना

झरीजामणी तालुक्यातील विद्यार्थी पुस्तकाविना

140

●शिक्षणविभागात पुस्तके धूळखात 

 ●पुस्तक वाटपात दिरंगाई 

मुकुटबन : प्राथमिक शिक्षण हे विकासाचे लक्षण’ या ब्रीद वाक्याला अनुसरून शिक्षण विभागाने विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नयेत. यासाठी मोठा गाजावाजा करीत सर्व शिक्षाअभियाना अंतर्गत मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने पहिली ते आठवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरित देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. परंतु झरीजामणी तालुक्यातील शाळांना अजूनही पुस्तके वितरित करण्या आले नाहीत. परिणामी तालुक्यातील विध्यार्थी पुस्तकाविना पडला आहेत. आजही पुस्तके शिक्षण विभागात धूळखात पडले आहेत .अशा पुस्तक वाटप दिरंगाईमुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत.

साधारणतः 28 जूनला तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात आले. यादरम्यान आज तिन महिन्याचा कालावधी लोटूनही  विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात आली नाही. तर शिक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश धडकवले. मात्र तालुक्यातील बहुतांश शाळांनी आदेशाला केराची टोपली दाखवली. यात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

स्वयंम अध्यापणाकरिता विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके आवश्यक आहेत. परंतु झरीजामणी शिक्षण विभागात शालेय पुस्तके उपलब्ध होऊनही ती शाळांना वितरित करण्यात आले नाहीत.  सध्या शिक्षण विभागात पुस्तके धुळखात पडलेली आहेत. तीन  महिन्याच्या कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित केली जात नसल्याने विद्यार्थी पुस्तकाविना अध्यायन असे करीत असेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.