● शिरपूर पोलिसांची कारवाई
● चालका वर गुन्हा दाखल
वणी –
वाहनात अनधिकृत कोळसा वाहून नेत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर ठाणेदार सचिन लूले यांना मिळाली. चोरीचा कोळसा असल्याचा संशय आल्याने वाहन ताब्यात घेऊन चालका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहे. या खाणीतून देशभरात कोळसा वितरित केल्या जातो मात्र वेकोली अधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘कोलमाफिया’ मोठ्या प्रमाणात कोळश्याची चोरी किंबहुना तस्करी करतात हे पोलिसांनी केलेल्या कारवाया वरून सिद्ध होत आहे.
दि 23 सप्टेंबर ला MH-28-T-1676 या आयशीयर वाहनातून कोरपना मार्गावरून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांना मिळाली होती. सदर वाहन थांबवून वाहनांची तपासणी केली असता वाहनात कोळसा आढळून आला.
चालक विशाल वैद्य याला कोळश्या बाबत विचारणा केली असता कोळसा कोरपना येथे नेण्यात येत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना संशय निर्माण झाल्याने वेकोली प्रशासनाशी संपर्क साधून माहिती मागविण्यात आली असून वाहन पोलीस ठाण्यात लावण्यात आले. चालक विशाल वैद्य व अन्य एका अनोळखी इसमा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी 5 लाख 50 हजार रुपये किमतीचे कोळसा भरलेले वाहन जप्त केले आहे.