Home Breaking News रॉयल चॅलेंजर्स व चेन्नई सुपर किंग सामन्यावर “सट्टा”

रॉयल चॅलेंजर्स व चेन्नई सुपर किंग सामन्यावर “सट्टा”

वणी पोलिसांची धाड, एक अटकेत, दुसरा फरार

वणी- शहरातील गुरू नगर परिसरात एका घरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळाली.  शुक्रवार दि.24 सप्टेंबर ला रात्री 9 वाजता डीबी पथकाने  धाड टाकून 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी एकाला ताब्यात घेतले असून दुसरा व्यक्ती फरार झाला आहे.

आयपीएल च्या क्रिकेट सामन्यावर क्षणाक्षणाला सट्टा लावल्या जातो. सटोडीये मोबाईल वरून लागवड करतात यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. क्रिकेटचा ज्वर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणाई झटपट पैसे कामविण्याच्या नादात सट्टा जुगाराकडे वळताना दिसत आहे.

शहरातील गुरूनगर मध्ये वास्तव्यास असलेले ईरशाद खान ईशरत खान (38) याचे घरीच आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी तात्काळ डीबी पथकाला कारवाईचे आदेश दिले. डीबी पथक प्रमुख आनंद पिंगळे व पथकांनी धाड टाकली. यावेळी 3 मोबाईल, 1लेपटॉप, 1 की बोर्ड, 1 प्रिंटर असा एकूण  76 हजार 350 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी इर्शाद ला ताब्यात घेतले असून अरविंद मडावी फरार झाला आहे.

Img 20250103 Wa0009

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार शाम सोनटक्के, डीबी पथक प्रमुख सपोनि आनंद पिंगळे, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, अशोक टेकाडे, पंकज उंबरकर, दीपक वंडर्सवार, हरींद्रकुमार भारती, विशाल गेडाम, वसीम शेख, शंकर चौधरी यांनी केली.