● ट्रकचा झाला कोळसा
रेल्वे सायडिंग वर कोळसा खाली करून खाणीत जात असलेला ट्रक अडवून अज्ञात 6 ते 7 इसमांनी पेट्रोल टाकून जळल्याची घटना घडली असून ट्रक चा कोळसा झाला आहे.
तालुक्यात 14 कोळसा खाणी आहेत.या खाणीतून निघालेला कोळसा ट्रकच्या सहाय्याने रेल्वे सायडिंग वर आणल्या जातो. आणि त्यानंतर रेल्वेने तो देशभरात वितरित केल्या जातो. रेल्वे सायडिंग वर कोळसा पोहचविण्यासाठी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना ठेका दिला जातो.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड ची पैनगंगा कोळसा खान आहे. ही खान नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. कोळसा उचलण्याकरिता वाहतूकदारा मध्ये होणारे वाद हे नेहमीचेच झाले आहे. तसेच या खाणीत कोळसा माफियांनी चांगलेच वर्चस्व निर्माण केले आहे.
चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या MH 34 BG 0862 चा ट्रक रविवार दि 3 ऑक्टोबर ला रात्री 9 वाजताचे सुमारास कोळसा भरून येत असतांना मंगोली चेक पोस्ट जवळ तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 6 ते 7 इसमांनी ट्रक थांबविला चालकाला खाली उतरविले व चालकाला धमकी देऊन ट्रक पेट्रोल टाकून जाळला व घटनास्थळा वरून पळ काढला या बाबत शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड करीत आहे.
वणी – प्रतिनिधी