● धानोरा येथील 80 वर्षीय महिला ठार
तालुक्यातील धानोरा येथे वास्तव्यास असलेली 80 वर्षीय महिला सोमवार दि. 4 ऑक्टोबर ला दुपारी 1 वाजता गावलागतच शौचास गेली होती. अचानक आलेल्या मालगाडीने तिला जबर धडक दिली यात तिचा जागेवरच मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ माजली आहे.
रामक्काबाई देवंना पार्लेवार (80) असे मृत महिलेचे नाव आहे. दुपारी 1 वाजताच्या सुमारास ती रेल्वे रुळा जवळ शौचास गेली होती. परत येतांना अचानक मालगाडी येत असल्याचे दिसल्याने ती घाबरली व रेल्वे रुळाच्या मध्ये पडली व रेल्वेच्या धडकेने दूर फेकल्या गेली व तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यु झाला.
वणी कडून आदीलाबाद कडे जाणारी के.एस.एन.के. नावाच्या मालगाडीने धडक दिली असून रेल्वे चालकाने अनेकदा हॉर्न वाजविला. परंतु घाबरलेल्या महिलेला काही कळलेच नाही आणि घटना घडली. रेल्वे अपघातात ठार झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे पोलिसांना देण्यात आली.
तापसार्थ वरोरा येथून रेल्वे पोलीस धानोरा रेल्वे स्थानकावर पोहचले तसेच पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ठोमरे व जमादार श्यामसुंदर रायके सुद्धा पोहचले. पोलिसांनी पंचनामा केला मृतक वयोवृद्ध असल्याने तिचे शवविच्छेदन न करता नातेवाईक व ग्रामस्थांना मृतदेह सोपवला.
झरी: बातमीदार