● आणिअत्याचाराचे बिंग फुटले
पुनवट येथील 14 वर्षीय बलिकेला धमकावून बळजबरीने अत्याचार करण्यात आला. आई ला जीवे मारण्याची धमकी देत आपले इस्पित साध्य करणाऱ्या 24 वर्षीय नराधमाला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुनवट येथील अल्पवयीन बालिका गावातील शाळेत इय्यता 9 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. दि 5 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता शाळेत जात असतांना गावातील सागर राजू सातपुते वय 24 याने तिला अडवले व तू मला खुप आवडते तू माझ्या सोबत माझ्या घरी चल असे म्हटल्यामुळे बालिका प्रचंड घाबरली.
काही दिवसानंतर पुन्हा दि 27 सप्टेंबर ला सागर ने तिला शाळेत जात असतांना त्याच्या घरा जवळ अडवले. व जबरदस्तीने तिचा हात धरून तिला घरात ओढून नेले. तिला बळजबरीने मागून पकडले आणि लगतच असलेल्या पलंगावर तिला पडून अत्याचार केला.
घडलेल्या प्रकाराने बालिका प्रचंड घाबरली. तर या बाबत कुणाला काही सांगितले तर तुझ्या आईला मारून टाकीन अशी धमकी दिली होती. त्यामुळे याची वाच्यता बलिकेने कुठेही केली नाही. मात्र हिंमत वाढलेल्या सागर ने दि 6 ऑक्टोबर ला बलिकेला ट्युशन वरून येत असतांना परत माझ्या घरी चाल असा आग्रह केला.
बालिका भेदरलेल्या अवस्थेत घरी आली वारंवार आपल्यावर आता अत्याचार होणार त्यामुळे तिने आपले जीवन संपवण्याचा विचार केला. घरातील संडास साफ करण्याचे हारपिक प्राशन केले. आईच्या ही बाब लक्षात येताच तिला वणी येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार झाल्यावर तिला 8 ऑक्टोबर ला दवाखान्यातून सुट्टी झाली.
पीडित बलिकेच्याआई व मामाने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेली घटना सांगितली. त्यांनी कोणताही विलंब न करता थेट शिरपूर पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघता आरोपी सागर सातपुते याला ताब्यात घेत कलम 376,(3), 35-,D, 341, 506,भा.द.वी, कलम 4, 6, 8, 12, बा.लै.अ.संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांचे मार्गदर्शनात पोउनि राम कांडूरे, सुगत दिवेकर करीत आहे.
वणी: बातमीदार