TDRF कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन
जिल्ह्यातील सर्व रुग्णालये व बँका टाळेबंदी (Lockdown) मध्येही सतत सुरु होत्या व आत्ताही सुरु आहेत. सोबतच जिल्ह्यातील सर्व उद्योग व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आले आहे. तर आत्ता शाळाही सुरु झाल्या आहेत. सर्व यंत्रणांचा योग्य वापर करण्याचे पुरेपूर ज्ञान तेथे कार्यरत असणाऱ्या बऱ्याच नागरिकांना नाही यामुळे सर्व आस्थापनांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत TDRF अधिकारी व जवानांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
आस्थापनानमध्ये आपत्ती पासून बचाव करण्यासठी अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहे. परंतु या सर्व यंत्रणांचा योग्य वापर करण्याचे पुरेपूर ज्ञान तेथे कार्यरत असणाऱ्या बऱ्याच नागरिकांना नाही आहे. यामुळे भविष्यात एखाद्या मोठी आपत्ती होऊन त्यात जीवित व वित्तहानी होऊ शकते.
आग लागणे, वीज पडणे, शॉट सर्किट होणे, प्रथमोपचार तसेच आपत्तीच्या वेळी इव्ह्याक्युव्हेशन करणे या सर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती हि जिल्ह्यातील नागरिक, कर्मचारी, शिक्षक, कारखानदार, मजूर व विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचेल व कोणत्याही आपत्तीच्या वेळी प्रशासकीय मदतीची वाट न बघता सर्व नागरिक स्वतः चा व नागरिकांचा जीव वाचवू शकेल अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मागील 16 वर्षापासून सतत कार्यरत असलेल्या तसेच आपत्ती व्यवस्थापनात कार्य करण्यासाठी अधिकृत व तज्ञ असलेल्या TDRF कडून सर्व शाळा, रुग्णालये, बँका,लहान-मोठे उद्योग अशा सर्व आस्थापनांनमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी – कर्मचारी व इतर नागरीकांना आपत्तीपासून सुरक्षित करण्यासाठी सर्व ठिकाणी त्या आस्थापनांचा कृती आराखडा सोबतच DRR प्लॅन तयार करून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण व रंगीत तालीम घेणे असे सर्व उपक्रम राबविण्यासाठी आदेशित करावे असे निवेदन देण्यात आले आहे.
सोबतच जिल्हा शल्य चिकित्सक, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व आस्थापनांना प्रशिक्षण घेणे बंधन कारक करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांना TDRF बटालियन चे जिल्हा समादेशक अभिषेक राजहंस, यवतमाळ तालुक्याचे कंपनी कमांडर शुभम बैस, TDRF जवान मोहित राठोड, मनीष जाधव, दर्शन जांभुळे, यश कन्नाके, यश गेडाम, तेजस्वी राठोड यांनी जिल्यात तर वणी मध्ये कंपनी कमांडर मुस्कान सय्यद, काजल वाळके, स्वीटी देवगडे, ऋचा दारुंडे, संजना देवगडे, सानिया आसुटकर TDRF अधिकारी व जवानांनी निवेदन दिले.