● उतारवाडी जंञीसह 34 व्यक्ती ताब्यात
● शहरातील सर्वात मोठी कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रदिप परदेशी यांना प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे एलसीबीचे पथक व सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी येथील एकता नगर परिसरात बुधवारी सायंकाळी धाड टाकली. यावेळी तब्ब्ल 34 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असुन उतारवाडी जंञीसह मटका साहित्य व पाऊणशे माबाईल संच जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई वणी शहरातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे.
शहरात लपूनछपून मटका जुगार खेळल्या जातो परंतु एवढया मोठया प्रमाणात उतारवाडी होत असल्याचे प्रथमच निदर्शनांस आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रदिप परदेशी यांना गोपनिय माहिती मिळाली होती. त्या आधारे त्यांनी सायबर सेल सह सापळा रचला, दुपारी 5 वाजताच्या सुमारास एकता नगर परिसरातील नविन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकण्यात आली.
पोलीसांनी चांगलीच खबरदारी घेत घरात प्रवेश केला असता तेथे मटका उतारवाडीची जंञीच पोलीसांच्या हाती लागली. यावेळी तेथे 25 व्यक्ती आढळून आले तर लगतच असलेल्या घरातुन 9 असे 34 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे जवळून तब्बल 75 मोबाईल संच, लॅपटॉप, मटका उतारवाडीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मटका उतारवाडी करणारे मिनाज शेख असल्याचे पोलीस सुञांनी सांगीतले असुन वणी शहरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे. पोलीसांची कारवाई सुरू असुन नेमका किती रूपयांचा मुददेमाल हस्तगत केला हे स्पष्ट झाले नाही.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनांखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रदिप परदेशी, सायबर सेलच्या पोलीस निरिक्षक दिपमाला भेंडे, सपोनि अमोल पुरी, पोलीस उपनिरिक्षक भगवान पायघन, गजानन डोंगरे, विशाल भगत, उल्हास कूरकूटे, कविश पाळेकर, सलमान शेख, मो. भगतवाले, किशोर झेंडेकर यांनी केली.
वणी: बातमीदार