● वर्ल्डकप T-20 सामन्याच्या पहिल्याच दिवशी कारवाई
वर्ल्डकप T-20 च्या सामन्याला आज पासून धडाक्यात सुरवात झाली आहे. या सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा खेळल्या जातो. त्यामुळे सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच पोलीस सतर्क असल्याचे दिसत असून शहरातील रंगनाथ नगर येथे पोलिसांनी क्रिकेट बेटिंगचा धुव्वा उडवत दोघांना ताब्यात घेतले आहे.
क्रिकेट सामन्याचा ज्वर कमालीचा वाढला आहे. तरुणाई झटपट पैसे कामविण्याच्या नादात क्रिकेट बेटिंग कडे वळल्याचे विदारक चित्र दिसत आहे. सामन्यात क्षणाक्षणाला सट्टा लावल्या जातो. या बेटिंग मुळे अनेक परिवार देशोधडीला लागले आहेत.
शनिवार दि.23 ऑक्टोबर पासून T-20 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यावर करोडो ची उलाढाल होणार असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघात सुरू असलेल्या सामन्यात सट्टा खेळल्या जात असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळाली होती.
रंगनाथ नगर येथील राजू चापडे याचे घरी धाड टाकली असता क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असल्याचे आढळून आल्याने राजू चापडे सह साहिल झाडे याला ताब्यात घेतले असून त्यांचे जवळून लॅपटॉप, टीव्ही संच व 6 मोबाईल जप्त केले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शाम सोनटक्के, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, हरेंद्र भरती, विशाल गेडाम, अशोक टेकाडे, शंकर चौधरी, डोमजी भादीकर यांनी केली.
वणी: बातमीदार