● अनर्थ झाल्यास WCL व्यवस्थापन जबाबदार
तालुक्यातील राजूर ग्रामपंचायती अंतर्गत मूलभूत विकास कामाची जबाबदारी WCL ची आहे. परंतू प्रभाग 4 मधील मोठया नाल्याची सफाई करण्यात आली नाही यामुळे घरात पाणी शिरत असल्याने अनवर खान हफिज रजा यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. ग्रामपंचायतीने WCL ला ‘अल्टीमेटम’ देत तातडीने समस्यांचे निराकरण करावे असे पत्र सब एरिया मैनेजरला दिले आहे.
वार्ड क्रमांक 4 मध्ये वास्तव्यास असलेल्या अनवर खान हाफिज खान यांच्या घरात चक्क नालीचे सांडपाणी शिरत असल्याची तक्रार तक्रार ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती. नालीची साफसफाई न केल्यास दि. 29 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
राजूर ग्रामपंचायतच्या सरपंच विद्या डेव्हिड पेरकावार यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत WCL ला खडेबोल सुनावले आहे. गावातील मूलभूत समस्यांची सोडवणूक WCL ने करणे गरजेचे असून कोणताही अनर्थ घडल्यास सर्वस्वी WCL व्यवस्थापन जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे तक्रारकर्ता 29 ऑक्टोबरला आमरण उपोषणाला बसणार का याकडे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार