Home वणी परिसर रसायनशास्त्राची विद्यापीठ स्तरीय सेमिनार स्पर्धा

रसायनशास्त्राची विद्यापीठ स्तरीय सेमिनार स्पर्धा

139

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत समस्त विज्ञान  महाविद्यालयां मधील विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित रसायनशास्त्र विषयाची सेमीनार स्पर्धा लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्यासपीठावर संपन्न झाली.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, उद्घाटक आणि बीजभाषक डॉ एस पी देशमुख यांच्यासह डॉ पी आर राजपूत, डॉ. के.एन. पुरी, डॉ. पी. जे गांजरे, डॉ. एस एस कांबळे, डॉ सुमेर ठाकूर तथा डॉ. प्रवीण रघुवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

रसायन शास्त्र विषय शिकवणाऱ्या महाविद्यालयातील विविध प्राध्यापकासह सुमारे 200 विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन सेमिनार स्पर्धेत सहभाग घेतला.प्रास्ताविकात लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनंदा आस्वले यांनी अशा स्वरूपातील स्पर्धा 15 वर्षापूर्वी देखील आयोजित केली होती हे सांगत इतिहासाला उजाळा दिला आणि रसायन शास्त्र विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली.

बीजभाषणामध्ये डॉ. देशमुख यांनी आयुक्टा चे कार्य विशद करून  सध्या सुरू असते या रजत महोत्सवाबद्दल उपस्थितांना उद्बोधन केले.डॉ. राजपूत यांनी आशा सेमिनार चे महत्व स्पष्ट केले तर डॉ. पुरी यांनी विद्यार्थी जीवनातील परीश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.अध्यक्षीय मनोगतात डॉ प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या विविध कार्याचे कौतुक केले.

या वेळी घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या सेमीनार स्पर्धेत श्रद्धा गणेश मेहरे, सुरभी अतुल अटारा आणि समन शेख यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके आयुक्टा च्या वतीने तर श्रावणी नंदकिशोर बावणेर हिला लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

डॉ. प्रविण गांजरे आणि डॉ. शैलेश कांबळे यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली.श्रद्धा मेहरे हिने विजेत्यांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अमित काळे यांनी तर आभार प्रदर्शन श्वेता राऊत यांनी केले.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शोध पत्रांचा संग्रह लवकरच ई-बुक स्वरूपात किंवा युट्युब लिंक च्या माध्यमातून सगळ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा श्रोत्यांमधून व्यक्त करण्यात आली.

वणी:बातमीदार