Home Breaking News थरार… चक्क… ‘देरकर’ यांचेवर प्राणघातक ‘हल्ला’

थरार… चक्क… ‘देरकर’ यांचेवर प्राणघातक ‘हल्ला’

दगडाने प्रहार, उपचारासाठी चंद्रपूरला दाखल

मारेगाव तालुक्यातील बोटोनी – वेगाव गणातील जिल्हा परिषद सदस्याला क्षुल्लक कारणावरून दुचाकीस्वाराने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर चंद्रपुरात उपचार सुरू आहेत. देरकरांवर झालेल्या अनपेक्षित हल्ल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

अनिल देरकर हे लोकप्रतिनिधी असून ते आपल्या मूळ गाव असलेल्या वेगाव येथे गेले होते. सकाळी रस्त्या लगत उभे असतांना मारेगाव वरून दुचाकीने येणाऱ्या युवकास नमस्कार केला आणि घात झाला.

काहीच कारण नसताना त्या दुचाकीस्वारांनी लगतच असलेला मोठा दगड उचलून चक्क देरकर यांचेवर फेकून मारला. अनपेक्षित झालेल्या हल्ल्यात देरकर गंभीर जखमी झालेत.

Img 20250103 Wa0009

अचानक झालेल्या हल्ल्यात देरकर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांनी त्यांना तात्काळ मारेगाव येथे उपचारार्थ हलवले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे.

देरकर यांचेवर हल्ला करताच माथेफिरू युवकांनी पलायन केले. घडलेल्या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. समर्थक संतप्त झाले असून मारेगाव पोलीस सतर्क झाले आहेत. अनिल देरकर हे काँग्रेस चे जिल्हा परिषद सदस्य असून या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात चंगलीच खळबळ उडाली आहे.
मारेगाव: बातमीदार