● गळफास घेऊन संपविले जीवन
शहरातील देशमुख वाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या 39 वर्षीय युवक शिक्षकाने यवतमाळ येथील घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सचिन कृष्णाजी झाडे असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. तो येथील देशमुख वाडी येथील रहिवासी आहे. वणी येथील एका शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाला होता.काही वर्षांपूर्वी विद्यार्थी संख्या कमी झाली त्यामुळे तो अतिरिक्त झाला होता.
त्याची बदली यवतमाळ येथे करण्यात आली होती.गेल्या काही वर्षांपासून तो आपल्या पत्नी व मुला सह वाघापूर यवतमाळ येथे वास्तव्यास होता. दि 21 नोव्हेंबर च्या रात्रीला घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
सचिन हा अतिशय शांत व मनमीळाऊ स्वभावाचा होता. त्याने उचललेले या टोकाच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने नेमकी आत्महत्या का केली याची माहिती कळू शकली नाही.
वणी: बातमीदार