● मानकी शिवारातील घटना
महिन्याभरा पासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. काही ठिकाणी चालक व वाहक कामावर रुजू झाल्याने बस फेऱ्या सुरू झाल्या आहे. दि 8 डिसेंबर ला वणी आगाराची पाटण वरून येणाऱ्या बस वर अज्ञात इसमाने दगड फेक केल्याची घटना घडली आहे.

शासनाने पगार वाढ करून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. मात्र विलगिकरणाचा मुद्दा उपस्थित करून एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. तसेच प्रवाश्यांचे देखील हाल होत आहे.
वणी आगारातील सात वाहक व सात चालक असे 14 कर्मचारी कामावर रुजू झाल्याने वणी आगारातून काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे. दि 8 डिसेंबर ला वणी ते पाटण करिता फेरी सोडण्यात आली होती.
बुधवारी एम एच 40 एन 8464 क्रमांकाची बस परत येत असतांना दुपारी 3 वाजताच्या सुमारास मानकी गावाजवळ अज्ञात इसमाने बस वर दगड फेक केली यामध्ये बस ची समोरील काच फुटली आहे. यामध्ये बस चे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
वणी: बातमीदार