Home क्राईम थरार….वडिलांच्या प्रेयसीला धाडले ‘यमसदनी’

थरार….वडिलांच्या प्रेयसीला धाडले ‘यमसदनी’

1635

पाच तासात हत्येचा छडा

आई-वडिलांच्या सुखी संसारात ‘ती’ चा शिरकाव मुलाला अस्वस्थ करत होता. विधिसंघर्ष ग्रस्त असलेल्या चुलत भावाला सोबत घेत तिचा कायमचा काटा काढण्याचे ठरले आणि बुधवार दि. 8 डिसेंबर ला सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान धारदार शस्त्राने सपासप वार करून वडिलांच्या प्रेयसीला ‘यमसदनी’ धाडल्याचा थरार चंद्रपुरात घडला.

Img 20250422 wa0027

मना मनोज कोठार (35) असे मृतक महिलेचे नाव आहे. तिची रमाबाई नगर परिसरात झरपट नदीच्या काठावर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

Img 20250103 Wa0009

रामनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासातच हत्त्येचा छडा लावत दोघांना ताब्यात घेतले. यातील एक विधिसंघर्ष ग्रस्त असून दुसऱ्याचे नाव अमरजित शशीकपूर चव्हाण (20) असे आहे.

मृतक मना कोठार ही विवाहित आहे ती मागील एक वर्षांपासून पती पासून विभक्त राहते. एकटीच राहत असल्याने तिचे शशिकपूर चव्हाण सोबत सूत जुळले, जवळीक वाढायला लागली. आई- वडिलांच्या संसारात तिने केलेली ‘एंट्री’ मुलगा ‘अमरजित’ ला खटकायला लागली.

घरातील बिघडणारे वातावरण बघून ‘अमरजित’ अस्वस्थ झाला तिचा काटा काढण्याचे ठरले. याकरीता त्याने अल्पवयीन चुलतभावला सोबत घेत वडिलांच्या प्रेयसी ची धारदार शस्त्राने हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ‘ती’ ला प्रत्यक्षदर्शींनी बघताच पोलिसांना कळवण्यात आले.

रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपानी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तपासाची सूत्रे हाती घेत चव्हाण यांची मुले घरातून बेपत्ता असल्याचे लक्षात येताच संशय बळावला आणि अवघ्या पाच तासातच आरोपीना जेरबंद करण्यात आले.
चंद्रपूर: बातमीदार

Previous articleसंसदेत खासदार धानोरकरांचा मराठी बाणा
Next articleवाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.