● शिरपूर पोलिसांची कोंबडबाजारावर धाड
वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी गावाजवळील जंगलात कोंबड बाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली. रविवार दि. 19 डिसेंबर ला सापळा रचून अवलंबलेल्या धाड सत्रात आठ आरोपीना ताब्यात घेत दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

शेतकऱ्यांकडे पैशाची आवक सुरू होताच कोंबड्याच्या झुंजी लावून हारजित करणाऱ्याना चांगलाच उत येतो. ग्रामीण भागातील जंगलसदृश्य भागात कोंबड बाजार भरवल्या जातो. लपूनछपून चालणाऱ्या या अवैद्य धंद्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते.
रविवारी दुपारी पिंपरी गांवाजवळील स्मशानभुमी लगत असलेल्या बाभळीच्या जंगलात कोंबड्याची झुंज लावुन त्यावर काही व्यक्ती हारजितचा जुगार खेळत असल्याची माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली. त्यांनी PSI रामेश्वर कांडूरे व पोलीस पथकासह वेशभूषा बदलून सापळा रचला व धाड टाकली.
याप्रसंगी हारजितचा जुगार खेळणारे राकेश महादेव महाकुलकार (29) रा.पठारपुर, राजु पुरुषोत्तम पिंपळकार (39) रा.पठारपुर, हर्षल आनंदराव कळसकर (19) रा.सैदाबाद, बंडू शेषेराव गेडाम (50) रा. पिंपरी, परसराम वळीराम ढेंगळे (58) रा. पुरड, विठठल मारोती पिरसावळे (40) बाबापूर, सुधीर गजानन पाचभाई (36) रा. आडेगांव, देवानंद आनंद मोकासे (57) रा.साफल्य नगरी वणी असे असे ताब्यातील व्यक्तींची नावे आहेत.
घटनास्थळावर जिवंत व मृत झुंजीचे कोंबडे, दुचाकी व रोकड असा एकूण 2 लाख 950 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत 8 संशयित आरोपीना ताब्यात घेत महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, गंगाधर घोडाम, अभीजीत कोषटवार, प्रमोद जुनुनकर, सुनिल दुबे, अमोल कोवे, राजु ईसनकर, गजानन सावसाकडे, निलेश केशवराव भुसे, विजय फुलके यांनी केली आहे.
वणी: बातमीदार