Home Breaking News धक्कादायक..शेतात गेलेली वृद्ध महिला नदीत बुडाली !

धक्कादायक..शेतात गेलेली वृद्ध महिला नदीत बुडाली !

ती..नदीत का उतरली याबाबत संभ्रम

वणी: शेतातून हरभऱ्याची भाजी आणतो असे सांगून घरातून बाहेर पडलेली वृध्दा वर्धा नदीत बुडल्याची खळबळजनक घटना दि 19 डिसेंबर ला दुपारी 5 वाजताचे सुमारास घडली. ग्रामस्थ तिचा शोध घेत आहेत.

मंजुळा महादेव तुराणकर (70) ही वृध्दा कोना या गावात वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी रविवारी दुपारी 5 वाजताचे सुमारास ती शेतातून हरभऱ्याची भाजी आणण्यासाठी शेतात गेली होती.

म्हातारी बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही यामुळे पारिवारिक मंडळींनी तिचा शोध सुरू केला होता. त्यातच एका महिलेने ती नदीपात्रात उतरल्याचे सांगितल्याने ती नदीत तर बुडाली नाही ना असा संशय बळावला.

Img 20250103 Wa0009

त्या प्रत्यक्षदर्शींनी सदर माहिती ग्रामस्थांना दिली. गावातील काही युवकांनी व कुटुंबातील व्यक्तींनी रात्री उशिरापर्यंत नदी पात्रात तिचा शोध घेतला मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. या बाबत महसूल व पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.
वणी: बातमीदार