Home क्राईम पोलीस नाकाबंदी दरम्यान 75 कारवाया

पोलीस नाकाबंदी दरम्यान 75 कारवाया

25 हजार रुपये दंड वसूल

वणी: मावळत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई शहरात जल्लोष करतात. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होवू नये व कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा यांचे वतीने नाकाबंदी व विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी 75 केसेस व कारवाया करून 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

मावळत्या वर्षाचा शेवटचा दिवस व नव वर्षाचे स्वागत करण्याचे फॅड कमालीचे वाढले आहे. तरुणाई या दिवशी सुसाट व सैराट झाल्याचे बघायला मिळते. याप्रसंगी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असतात.

पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार शाम सोनटक्के व वाहतूक शाखेचे सपोनि मुकुंद कवाडे यांनी संयुक्तरित्या दि.31 डिसेंबर ला नाकाबंदी व विशेष मोहीम राबवली. गस्त वाढवण्यात आली आणि या दरम्यान विविध प्रकरणी तब्बल 75 कारवाया करण्यात आल्या.

Img 20250103 Wa0009

नववर्षाच्या जल्लोषात अनुचित घटना, अपघात घडू नये यासाठी विशेष मोहीम राबवून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 10 इसमावर कारवाई करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून घेऊन जाणाऱ्या 6 वाहनावर तर 31 डिसेंबरला 75 केसेस व कारवाया करून महसूल 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
वणी: बातमीदार