Home वणी परिसर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पारिवारिक स्नेहसंमेलन

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पारिवारिक स्नेहसंमेलन

568

वणी:– येथील वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वणीच्या वतीने नववर्षाच्या निमित्ताने 1 जानेवारीला येथील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात पारिवारिक स्नेहसंमेलन पार पडले.

या स्नेहसंमेलनाचे उदघाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, दिनकरराव पावडे, केंद्रीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सदस्य रमण अग्रवाल, अमरावती झोनचे अध्यक्ष संजय पिंपळखुटे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पंकज नानवाणी, जिल्हा सचिव संजय बोरुले ,अध्यक्ष यवतमाळ जिल्हा औषधी विक्रेता नागरी सहकारी पत संस्था यवतमाळ दीपक कोकाटे उपस्थित होते.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आयोजित या पारिवारिक स्नेहसंमेलनात पूर्ण दिवसभर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या परिवारातील सदस्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, हाजीर सो वजीर अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संतोष देठे, बाबाराव बोबडे, गजानन अड्रस्कर, संजय केदार, प्रकाश पांडे या जेष्ठ सदस्यांचा त्यांच्या दीर्घ सेवेबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित अतिथींनी प्रसंगानुरूप मनोगत व्यक्त केले. उदघाटक म्हणून बोलतांना हंसराज अहिर यांनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संघटन शक्तीचे कौतुक करून याद्वारे अशा संघटना समाजोपयोगी मोठे काम उभे करू शकतात असा विश्वास व्यक्त करून पारिवारिक स्नेहसंमेलनाला शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषण करतांना तारेंद्र बोर्डे यांनी नगर परिषदेच्या मोकळ्या जागेपैकी या असोसिएशन साठी 5 हजार फूट जागा देण्याचा ठराव मंजूर करून दिल्याची माहिती देऊन शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष रवी येरणे यांनी केले. संचालन शाखेचे सचिव जितेंद्र डाबरे यांनी केले. आभार प्रदर्शन वणी शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे यांनी केले.

या पारिवारिक संमेलनाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत गारघाटे,कपिल उपाध्ये, उज्ज्वल पांडे,विजय बुराण,अजय खटोड, अंकुश कोठारी,लक्ष्मीकांत हेडाऊ,लोकेश झाजेड,नासीर शेख,शैलेश बाफना,अमित लिचोडे,प्रतीक कुचमवार,पंकज कासावार यांनी परिश्रम घेतले.
वणी:बातमीदार