Home वणी परिसर सुवर्ण संधी…..ई-श्रम कार्ड नोंदणी व वितरण

सुवर्ण संधी…..ई-श्रम कार्ड नोंदणी व वितरण

327

कामगारांनी लाभ घ्यावा

वणी: सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य क्रांती युवा संघटना सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित असते. ई- श्रम कार्ड चे फायदे लक्षात घेता 10 जानेवारी पर्यंत भव्य शिबिराचे आयोजन क्रांती युवा संघटना कार्यालय गाडगे बाबा चौक वणी येथे करण्यात आले आहे.

क्रांतीयुवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष, पुसद अर्बन को ऑप बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा तसेच आमिर बिल्डर्स चे संचालक जमीर खान यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून अत्यंत उपयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

● ई-श्रम कार्ड काढण्याचे फायदे ●
पंजिकृत कामगाराचा अपघात झाल्यास त्यात कामगार मरण पावल्यास किंवा पूर्णतः अपंग झाल्यास दोन लक्ष रुपयांची मदत आणि आंशिक अपंगत्व आल्यास एक लक्ष रुपयांच्या मदतीसाठी पात्र ठरतो. पंजिकरण केल्याबरोबर कामगारास एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर मिळतो, तसेच कामगारांचे वय 18 ते 60 च्या दरम्यान असावे कामगार इन्कम टॅक्स भरणारा नसावा कामगार ई पी एफ ओ आणि ई एस आई सी चा सदस्य नसावा असे स्पष्ट संकेत आहेत.

नोंदणीसाठी पात्र व्यक्ती
बांधकाम कामगार, रस्त्यावरील फिरते विक्रेते, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, दुग्ध व्यवसाय करणारे, शेतकरी, ऑटो चालक, वृत्तपत्र विक्रेते, पशुपालन करणारे, शिलाई मशीन कामगार, सुतार काम करणारे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मीठ कामगार, पीठ गिरणी कामगार, न्हावी कामगार, ब्युटी पार्लर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर/नळ कारागीर आदी व्यक्ती पात्र असणार आहे.

अधिक माहिती करिता खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 9764253253, 9518585970, 9970073162, 9049496868

शासनाच्या नियमानुसार शासकीय कामकाजात व इतरही दैनंदिन उपयोगात येणाऱ्या ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर व कार्ड वितरण शिबिराचे आयोजन दिनांक 30 डिसेंबर 2021 ते 10 जानेवारी 2022 कालावधीत, करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त प्रमाणात गरजुनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार