● वंचित व जंगोम दलाचा निर्धार
● झरीतील विजयाने मिळाला बूस्टर डोज
वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका राष्ट्रीय जंगोम दल व वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार आहेत. याबाबत झरी येथे पार पडलेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. ही बैठक विठ्ठल उईके यांचे निवासस्थानी संपन्न झाली.

नुकत्याच झालेल्या झरीजामनी नगर पंचायत मध्ये गोंडवाना राष्ट्रीय जंगोम दलचे राष्ट्रीय अध्यक्ष मारोती उईके व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांचे लक्ष्मीकांत लोळगे यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप भोयर, मिलिंद पाटील, मंगल तेलंग, सुवर्णा वरखेडे, चेतन कुडमिथे, विठ्ठल उईके, कालिदास अर्के, राजू शेख, यांचे नेतृत्वात 9 जागेवर निवडणूक लढवून 4 उमेदवार निवडून आणत प्रस्थपिताना धक्का दिला.
झरी जामनी मधील विजयाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. हा परिसर आदिवासी बहुल भाग असल्याने या ठिकाणी आदिवासी युवकांच मजबूत संघटन म्हणजे जंगोल दल तयार झालं असून आदिवासी समाजाची एकता आता दिसून येत आहे. यातच या जंगोल दलाला वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाल्याने संघटनात आणखी भर पडली आहे.
झरी नगर पंचायतीत 4 नगर सेवक निवडून आल्याने गोंडवाना राष्ट्रीय जंगोम दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मारोती उईके यांनी सर्व नगर सेवकांचे स्वागत केले पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले. त्यानंतर वंचितच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीला वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांचे मार्गदर्शनाखाली झरीजामनी निवडणूक निरीक्षक मिलिंद पाटील हे उपस्थित होते.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढायचे असा निर्धार करण्यात आला. याप्रसंगी सुमित पंधरे, मुकेश कोकाट, डॉ अरविंद खंडाते, चेतन कुडमेथे, वासुदेव तोड़साम, मारोती कुसराम, कालिदास अरके, नवनिर्वाचित नगर सेवक ज्ञानेश्वर कोडापे, सीमा मंडाले, संगीता किनाके, अनिल आत्राम, मोहन अरके, प्रशांत किनाके, सचिन कुमरे, रतन मडावी, हरीश किनाके, छाया उइके यांच्यासह जंगोम दल व वंचित चे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
वणी: बातमीदार