● काँग्रेस चे SDPO ला निवेदन
वणी : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वणी येथे सरसंघचालक डॉ हेडगेवार यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य होते. त्यामुळे संघ परिवार व भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते आणि त्या वक्तव्याचा निषेध करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. त्यामुळे दहन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी कांग्रेसने केली आहे.
माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त वणी येथील शेतकरी लॉन मध्ये पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना मंत्री राऊत यांनीसरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे बाबत वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
संघ परिवार व भाजपा कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले आहेत. राऊत यांचा निषेध करण्याकरिता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पुतळ्या समोर मंत्री राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.
भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाने लावलेल्या स्वागत गेट वरील राऊत यांचे पोस्टर काढून त्याचे दहन केले होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते यांच्या भावना दुखावल्या गेल्या. याप्रकरणी SDPO संजय पूजलवार यांना निवेदन देऊन पोस्टर जाळणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदन देतांना राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद निकुरे, मोरेश्वर पावडे, ओम ठाकूर, डॉ महेंद्र लोढा, तेजराज बोढे, रवी देठे, वंदना आवारी, मंदा बांगरेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार