Home Breaking News बायको व मेहुण्याचा त्रास, ‘दत्ता’ ने घेतला गळफास

बायको व मेहुण्याचा त्रास, ‘दत्ता’ ने घेतला गळफास

2140
Img 20240930 Wa0028

● बिटरगाव पोलिसात गुन्हा नोंद, आरोपी पसार

उमरखेड: तालुक्यातील कृष्णापुर येथे वास्तव्यास असलेल्या 40 वर्षीय इसमाने घरातील छताला दोरीच्या साह्याने गळफास लावून पंधरा दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. पत्नी व मेव्हण्याच्या त्रासाने गळफास घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केल्याचे कळताच आरोपी पसार झाले आहेत.

दत्ता जळके (40) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पहिल्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर दत्ताचे दुसरे लग्न साखरा येथील अनिता हिंगडे हिच्या सोबत झाले होते. त्याला पहिल्या पत्नीपासून झालेली दोन अपत्य होती तर अनिता पासून एक असे तीन मुले व हे दोघे गावातच वेगळे राहत होते.

एक महिण्यापूर्वी दत्ता व पत्नी अनिता कार्यक्रमा निमित्त मोठा मेव्हणा दिलीप हिंगडे यांचेकडे सिंदगी या गावी गेले होते. तेथे त्याला अपमानित करून मारहाण करण्यात आली. यामुळे पत्नी अनिता माहेरी तर दत्ता आपल्या गावी परतले. दुसऱ्या दिवशी त्याला फोन करून पुन्हा बोलावण्यात आले. तो सासुरवाडीला पोहचला मात्र पुन्हा त्याला अपमानास्पद वागणूक देत पत्नीला त्याचे सोबत न पाठवता हाकलून दिले.

मेव्हण्यानी दत्ता ला दिलेली अपमानास्पद वागणूक व केलेली मारहाण तसेच पोलिसात केलेली तक्रार यामुळे दत्ता प्रचंड व्यथित झाला. तेव्हापासून दत्ता वडिलांकडे राहायला गेला होता. 15 मार्च ला पहाटे चार वाजताच्या सुमारास मृतकाच्या वडिलांनी उठून पाहिले मात्र दत्ता घरात दिसला नाही. त्याची शोधाशोध केली असता तो समोरच्या खोलीत छताला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

याप्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी बिटरगाव पोलिसात पत्नी व मेव्हणे यांच्या त्रासानेच दत्ता ने आत्महत्या केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनिता दत्ता जळके (30), पिंटू दिगंबर हिंगडे (29), संदीप दिंगबर हिंगडे (35) दिलीप दिगबर हिंगडे (40) सर्व रा. साखरा ता. उमरखेड यांचे विरुद्ध कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी पसार झाले असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मृतकाच्या नातेवाईकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उमरखेड : बातमीदार