Home Breaking News रामनवमीचा उत्साह, शोभायात्रेचा जल्लोष आणि गगनभेदी जयघोष

रामनवमीचा उत्साह, शोभायात्रेचा जल्लोष आणि गगनभेदी जयघोष

496

नेत्रदीपक रांगोळीने सजले शहर

वणी: प्रभू श्रीराम नवमीचा उत्सव संपूर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात येतो. वणी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. ढोल ताशाचा गजर, हवेत फडकणारे भगवे ध्वज, शोभयात्रेचा जल्लोष आणि गगनभेदी जयघोष यामुळे संपूर्ण शहर दुमदुमले तर नेत्रदीपक रांगोळीने शर सजले.

प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने जय्यत तयारी केल्याचे प्रकर्षांने जाणवले. कोरोना कालखंडातील दोन वर्षात लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. यावर्षी मात्र धुमधडाक्यात शोभायात्रा साजरी करण्यात आली.

सायंकाळी श्रीराम मंदिरातून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रा शाम टॉकीज चौक, दिपक चौपाटी, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सर्वोदय चौक, टागौर चौक, टुटी कमान, अणे चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँक चौक असे मार्गक्रमण करत श्रीराम मंदिरात आरती नंतर सांगता करण्यात येणार आहे.

शोभयात्रेच्या मार्गावर पुणे येथील रांगोळी कलाकार भुषण खंडारे यांनी आपली कला सादर करून संपूर्ण मार्ग रांगोळीने सजवले. अवघ्या काही क्षणात नेत्रदीपक रांगोळी काढून वणीकरांची वाहवा मिळवली.
वणी: बातमीदार