Home Breaking News त्या….व्यापाऱ्याच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

त्या….व्यापाऱ्याच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

622

शेतकऱ्यांना एक कोटींचा घातला होता गंडा

वणी: कृषी उत्पन्न बाजार समितीत 147 शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून सव्वा कोटी रुपये हडप करणाऱ्या ठकसेनाला वणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र योग्य प्रतिसाद देत नसल्याने पुन्हा पोलीस कोठडी मिळावी म्हणून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

धीरज सुराणा असे शेतकऱ्यांना गंडवणाऱ्या व्यापाऱ्यांचे नाव आहे. त्याने जानेवारी महिन्यात तब्बल 147 शेतकऱ्यांचे 1 हजार 935 क्विंटल सोयाबीन बाजार समितीच्या यार्डात खरेदी केले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनची एक दमडी न देता तो पसार झाला होता.

इनाम योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचा चुकारा, बाजार समितीची बाजार फी, शासनाची सुपरव्हिजन कॉस्ट फी आणि अडत्याची अडत असा एकूण 1 कोटी 15 लाख 26 हजार 46 रुयाची फसवणूक केल्याची तक्रार APMC चे सचिव अशोक झाडे यांनी पोलिसात केली होती.

तीन महिन्यापासून पसार झालेल्या ठकसेनाला वणी पोलिसांनी 18 एप्रिल ला ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले असता 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीचा कालावधी संपताच शुक्रवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे.
वणी: बातमीदार