Home Breaking News भीषण….आबड भवन ला आग, फर्निचरचे दुकान जळून ‘खाक’

भीषण….आबड भवन ला आग, फर्निचरचे दुकान जळून ‘खाक’

वणी :- टागोर चौकात असलेल्या आबड भवनला अचानक आग लागली यावेळी फर्निचरचे दुकान जळून खाक झाले आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास आबड भवनातुन धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या भवनाच्या लगतच असलेले फर्निचरचे दुकान आगीने आपल्या कवेत घेतले.

सदर फर्निचरच्या दुकानातले सर्व सामान जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत आहे. नेमकी आग कशाने लागली याची माहिती मिळू शकली नाही.

वणी : बातमीदार

Img 20250103 Wa0009