● आज तालुक्यासाठी सुवर्णदिन
वणी: आज लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत तालुक्यातील दोघांनी बाजी मारली असून सुमित रामटेके सोबतच डॉ. अकांक्षा तामगाडगे हिने देखील (UPSC)परीक्षा उत्तीर्ण केल्याने आज तालुक्यासाठी सुवर्णदिन असल्याचे दिसून येत आहे.
डॉ.अकांक्षा मिलिंद तामगाडगे हिने 12 वी पर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथून पूर्ण केले. आई माधुरी व वडील मिलिंद तामगाडगे हे दोघेही डॉक्टर आहेत त्यामुळे अकांक्षा ने सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. व सेवाग्राम येथील महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात MBBS चे शिक्षण पूर्ण केले.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. याकरिता पुणे येथे UPSC अभ्यासक्रमाची तयारी सुरू केली मात्र पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. त्यामुळे IAS होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अकांक्षा हिने पुन्हा जोमाने तयारी सुरू केली.
या दरम्यान कोरोना कालखंडात शिक्षणव्यवस्था ढासळली होती म्हणून अकांक्षा हिने घरूनच On line अभ्यास सुरु ठेवला. परिपूर्ण तयारी झाल्यानंतर तिने UPSC ची परीक्षा दिली. आज लागलेल्या निकालात तिला 562 वी रँक प्राप्त झाली असून प्रशासकीय सेवेचे दरवाजे तिच्यासाठी उघडे झाले आहे.
वणी: बातमीदार