Home Breaking News शिरपूर ठाण्यांतर्गत 85 गुन्ह्यातील आरोपींना ‘शिक्षा’

शिरपूर ठाण्यांतर्गत 85 गुन्ह्यातील आरोपींना ‘शिक्षा’

709
Img 20241016 Wa0023

गुन्ह्याचा छडा लावला शीघ्रगतीने

वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील crime बऱ्यापैकी संपुष्टात आला आहे. गुन्हा घडताच आरोपिताना जेरबंद करण्याचे प्रमाण वाढले आहेत. पोलीस ठाण्यांतर्गत तीन गुन्ह्यातील आरोपी व मोटरवाहन कायद्याअंतर्गत 82 गुन्ह्यातील आरोपींना लोकअदालत मध्ये शिक्षा झाली आहे. तर बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.

तालुक्यातील वेळाबाई येथे वास्तव्यास असलेल्या प्रमोद पुंडलिक निमसटकर (39) या शेतकऱ्यांची 60 हजार रुपये किमतीची बैलजोडी दि. 10 मे ला शेतातील गोठ्यातून चोरीला गेली होती. याप्रकरणी दि.28 मे ला शिरपूर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. ठाणेदार गजानन करेवाड यांनी तपास यंत्रणा कार्यान्वित करून आरोपी ला ताब्यात घेत तेलंगना राज्यातील बेला येथे विकलेली बैलजोडी हस्तगत केली.

शिरपूर पोलिसात सन 2015 मध्ये भादवि कलम 379, 34 सह कलम जमीन महसुल अधीनियम 1966 चे कलम 48(7) व (8) नुसार गुन्हा नोंद झाला होता. यातील संदिप बंडू गोवारदिपे (28) रा.ढाकोरी व रामदास गोविंदा भोपरे (68) रा. लहान पांढरकवडा या दोन्ही आरोपीना दोषी ठरवुन एक वर्ष साधी कैद व दहा हजार रुपये द्रव्यदंड व दंड न भरल्यास प्रत्येकी 03 महिन्याची साध्या कारावसाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

शिरपूर पोलिसात सन 2015 मध्ये भादवि कलम 279, 337, 338 नुसार नितीन उमाजी खोब्रागडे याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने दोषी धरुन न्यायालय उठे पर्यंत साध्या कारावसाची शिक्षा व एक हजार 500 रुपये द्रव्यदंड व द्रव्यदंड न भरल्यास 15 दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

शिरपूर पोलिसात सन 2016 मध्ये भादवि कलम 294, 323, 506 (2) अन्वये दत्ता महादेव येरगुडे (36) रा. कुरई याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीस दोषी धरुन न्यायालय उठे पर्यंत शिक्षा व तीन हजार रुपये द्रव्यदंड व दंड न भरल्यास 15 दिवस साध्या कारावसाची शिक्षा दिली आहे.

लोक अदालत मध्ये शिरपुर पोलीस स्टेशनचे भा.द.वि कायदा कलम 283 चे 38 गुन्हयातील आरोपी तसेच भादवि 269 चे 2 गुन्हयातील आरोपीने व कोटपा कायदा कलम 6 (ब) 24 गुन्ह्यातील 37 आरोपी असे एकुन शिक्षा कबुल करुन प्रत्येकी दोनशे रुपये दंड भरला आहे. तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) (ब) अन्वये 03 गुन्हयातील 09 आरोपीस तीन हजार रुपये दंड प्रती आरोपी 300 रुपये दंड व दंड न भरल्यास 05 दिवस कारावास अशी शिक्षा दिली आहे. तसेच मोटार वाहान कायदा कलम 66 / 992 मधील दोन आरोपीस दोन हजार रुपये दंड प्रत्येकी एक हजार असे एकुन 82 गुन्हयास लोकअदालत मध्ये शिक्षा झाली आहे.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे साहेब, SDPO संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, अशोक स्वामी, स्वाती कुटे, गंगाधर घोडाम, गजानन सावसाकडे, निलेश भुसे, सुनील दुबे, अमोल कोवे, गुनवंत पाटील, अनिल सुरपाम, सुगत दिवेकर, अभीजीत कोषटवार, राजन इंसनकर, विनोद मोतेराव, अंकुश कोहचाडे, पल्लवी बल्की, चालक विजय फुल्लुके यांनी केली आहे.
वणी: बातमीदार