Home Breaking News शनिवारी “श्री लक्ष्मीनारायण” पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा

शनिवारी “श्री लक्ष्मीनारायण” पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा

मंत्री यशोमती ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती

वणी: शहर व ग्रामिण भागातील सर्वसामान्य जनता व व्यावसायिकांचा आर्थिक स्तर उंचावण्याकरिता कर्ज पुरवठा करण्याचे ध्येय बाळगून रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेडच्या प्रचंड यशानंतर श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था सुरु होत आहे. शनिवार दि. 4 जून ला भव्य उद्घाटन सोहळा होणार असून महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

आयोजित उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा. बाळू धानोरकर, विशेष अतिथी संध्याताई सव्वालाखे, माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, वामनराव कासावार, आ.प्रतिभाताई धानोरकर, वामनराव चटप, डॉ. वजाहतजी मिर्झा हे असतील.

याप्रसंगी विश्वास नांदेकर, वसंत पुईखेडकर, टिकाराम कोंगरे, प्रफुल मानकर, राजुदास जाधव, विनायकराव एकरे, संजय देरकर, अरुणाताई खंडाळकर, नितीन कुंभलकर, प्रदिप बोनगीरवार, नरेंद्र पा. ठाकरे, वंदना आवारी, सुनिल कातकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Img 20250103 Wa0009

लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पत संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती साधण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे. महिला बचत गटांना बचतीची सवय लावणे व उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणे हा दृष्टीकोन संस्थेने समोर ठेवला आहे. ग्रामिण भागातील सर्वसामान्यांना या संस्थेच्या माध्यमातून सुवर्णसंधी उपलब्ध होणार असल्याचे मत संस्थेच्या अध्यक्षा संगिता संजय खाडे यांनी व्यक्त केले.

आयोजित उद्घाटन सोहळ्याला वणी शहर व ग्रामिण भागातील सर्व जनेतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संजय रा. खाडे, अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लि. व संगिता संजय खाडे अध्यक्ष, लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्यादित यांनी केले आहे.
वणी: बातमीदार