● अपमानास्पद वाटल्याने घेतला विषाचा घोट !
वणी: शेजाऱ्यासोबत काही कारणास्तव भांडण झाले. यामुळे अपमानास्पद वाटल्याने विषाचा घोट घेतला. पंधरा दिवस खाजगी रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या 54 वर्षीय इसमाने पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

नानाजी देवराव धानकी (54) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मारेगाव तालुक्यातील टाकरखेडा येथील निवासी आहेत. त्यांचे पंधरा दिवसांपूर्वी शेजाऱ्यासोबत वाद झाल्याचे बोलल्याजात असून त्या घटनेने अपमानित झाल्यानेच त्यांनी विष प्राशन केले असावे असा कयास वर्तविण्यात येत आहे.
नानाजी यांनी विष प्राशन केल्याचे समजताच पारिवारिक मंडळींनी त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले होते. अखेर रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी रात्री 1 वाजताच्या सुमारास पोलिसांना सूचित करण्यात आले. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना करीता त्यांना दाखल करण्यात आले असून शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार