● 90.33 टक्के गुण प्राप्त
वणी – येथील व्यावसायिक जयकुमार आबड यांचा मुलगा वंश आबड यांने बारावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवले. त्याला 90.33 टक्के गुण मिळाले आहे.

जयकुमार आबड हे वणी येथील प्रतिष्ठित व्यावसायिक आहे. त्यांचा मुलगा वंश हा नागपूर येथील सेंट पॉल स्कूल येथे इय्यता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12 वीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला आहे.यामध्ये वंश जयकुमार आबड याने 90.33 टक्के प्राप्त केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व गुरुजनांना दिले आहे.
वणी: बातमीदार