Home Breaking News अमित ठाकरे यांच्या वणी दौऱ्याची ‘उत्सुकता’

अमित ठाकरे यांच्या वणी दौऱ्याची ‘उत्सुकता’

मनविसेचा संवाद यात्रेत प्रतिपादन

वणी: यवतमाळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनविसेचे प्रमुख संघटक चेतन पेडणेकर व प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पेडणेकर म्हणाले की, लवकरच मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांचा पश्चिम विदर्भात दौरा असून ते वणीत येतील, असे स्पष्ट केले.

अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सूत्र हाती घेतल्यानंतर नव्या जोमाने कार्यकत्यांत उत्साह संचारला आहे. युवकांचे प्रश्न व त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच विदर्भातील मनविसेची पक्षबांधणी व संघटनात्मक बांधणी यासाठी अमित ठाकरे यांच्या आदेशान्वये पश्चिम विदर्भात संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

अमित ठाकरे यांचा संभाव्य दौरा लवकरच पश्चिम विदर्भात होणार आहे. त्यातच मनसेचा बालेकिल्ला असलेल्या वणी विभागात त्यांचे होणारे आगमन युवकांना उत्साहित करणारे आहे. विदर्भातील मनविसेची पक्षबांधणी व संघटनात्मक बांधणी प्रबळ करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहे.

Img 20250103 Wa0009

संवाद यात्रेच्या निमत्ताने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राज्य उपाध्यक्ष आनंद एबंडवार यांची उपस्थिती होती. तसेच शुभम भोयर, चांद बहादे, लाभेश खाडे, वैभव पुराणकर, संकेत पारखी, गुड्डू धोटे यांच्यासह वणी मारेगाव झरी तालुक्यातील युवक व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वणी: बातमीदार