Home Breaking News जिल्हा शिवसेनेत खांदेपालट, निष्ठावंतांना संधी

जिल्हा शिवसेनेत खांदेपालट, निष्ठावंतांना संधी

2576
Img 20241016 Wa0023

सह संपर्कप्रमुख बाळू मुनगिनवार
वणी तालुका संघटक लेडांगे, शहर प्रमुख थेरे

वणी: शिवसेनेतील अभूतपूर्व गळतीमुळे पक्षप्रमुख सावध भूमिका घेतांना दिसत आहे. जिल्हा शिवसेनेत निष्ठावंतांना संधी देत खांदेपालट करण्यात आला. सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी माजी आमदार श्रीकांत उर्फ बाळू मुनगिनवार यांचेवर सोपविण्यात आली तर वणी तालुका संघटक पदी गणपत लेडांगे तर शहर प्रमुख पदावर सुधीर थेरे यांना संधी देण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन मोठे नेते बंडखोरांच्या गळाला लागले आहेत. शिवसेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न संपूर्ण राज्यात होतांना दिसत आहे. मात्र निष्ठावंतांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी पुन्हा जोमाने करण्याची गरज सध्यस्थीतीत निर्माण झाली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी

वणी विधानसभा: तालुकासंघटक गणपत लेगांडे (वणी तालुका), शहरप्रमुख सुधीर थेरे – (वणी शहर).
उपजिल्हासंघटक सविता बेंद्रे (वणी विधानसभा)

दिग्रस विधानसभा : उपजिल्हा प्रमुख रविपाल गंधे, उपजिल्हा संघटक यादव गावंडे, उपजिल्हा समन्वयक पूनम पटेल, तालुकाप्रमुख – अजय गाडगे (दारव्हा तालुका), तालुकासंघटक सुधाकर पिंगाने ( दारव्हा – तालुका), तालुकासंघटक विनोद नेमाने – ( दारव्हा तालुका), तालुकाप्रमुख – नितीन माकोडे (नेर तालुका), तालुका संघटक अनिल चव्हाण (नेर तालुका), तालुकाप्रमुख यादव पवार ( दिग्रस तालुका), तालुका संघटक पांडुरंग पाटील (दिग्रस तालुका), शहरप्रमुख राहुल देशपांडे (दिग्रस शहर), शहरसंघटक सुधीर भोसले (दिग्रस शहर), शहरप्रमुख खुशाल मिसाळ (नेर शहर), शहरसंघटक गजानन दहेलकर (नेर शहर)

उमरखेड विधानसभा: विधानसभा सहसंघटक – प्रशांत जोशी, तालुकाप्रमुख संजय कुंभरवार – (उमरखेड तालुका, मतखंड बंदी भाग), तालुकासंघटक सचिन साखरे (उमरखेड तालुका), शहरप्रमुख तेजस नरवाडे – (महागांव शहर), शहरसंघटक अनिल गव्हाणे (महागांव शहर)

यवतमाळ विधानसभा: शहरप्रमुख नीलेश बेलोकार (यवतमाळ शहर, उत्तर), शहरप्रमुख योगेश भांदक्कर शहर समन्वयक तुषार देशमुख, शहरसंघटक चेतन सिरसाठ (यवतमाळ शहर) आर्णी विधानसभा : तालुकाप्रमुख मनोज ढगले (घाटंजी तालुका), शहरप्रमुख प्रशांत मस्के (घाटंजी शहर), तालुकाप्रमुख तिरुपती कंदकुरीवार (केळापूर तालुका)

पुसद विधानसभा: विधानसभा संघटक विकास जामकर (पुसद विधानसभा), तालुकासंघटक गणेश पागिरे (पुसद तालुका), राळेगांव विधानसभा : विधानसभा संघटक राजेश मांडवकर (राळेगांव विधानसभा), शहरसंघटक इमरान पठाण (राळेगांव – शहर) यांच्यावर पक्षाच्या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी पक्ष प्रमुखाने सोपवली आहे.
वणी: बातमीदार