Home Breaking News तालुक्‍यातील नागरीकांना सर्तकतेचा ‘ईशारा’

तालुक्‍यातील नागरीकांना सर्तकतेचा ‘ईशारा’

2078

धरणातुन पाण्‍याचा होतोय विसर्ग
पटाळा पुलावरून पाणी, वाहतूक ठप्प

वणीः बेबंळा, नवरगांव, अप्‍पर वर्धा, लोअर वर्धा ही सर्व धरणे पुर्ण भरली आहेत. त्‍या धरणातुन पाण्‍याचा विसर्ग करण्‍यात येत असल्‍याने नदीतील पाण्‍याची पातळी वाढणार आहे. यामुळे नदी व नाल्‍याच्‍या काठावरील गावातील नागरीकांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाच्‍या वतीने देण्‍यात आला आहे.

बेबंळा प्रकल्‍पाचे प्रकल्‍पाचे 18 दरवाजे 50 सेंमी ने उघडून 900 घमिसे ने विसर्ग सोमवार दि.18 जुलै ला सकाळी 10 वाजता पासुन करण्‍यात आला आहे. तर उर्ध्‍व वर्धा धरणातुन पाण्‍याचा मोठा विसर्ग करण्‍यात येत आहे. यामुळे तालुक्‍यातील वर्धा न‍दीपाञातील पाण्‍याच्‍या पातळीत वाढ झाली आहे. यापुर्वी 24 घन मिटर पाण्‍याचा विसर्ग सांडव्‍यावरुन दि.13 जुलैला सोडण्‍यात आला होता.   

तालुका आपत्‍ती प्राधिकरणाच्‍या माध्‍यमातुन तालुक्‍यातील सर्वनागरीकांना आवाहन करण्‍यात आले आहे. नागरीकांनी नदीपाञापासुन तसेच नाले व ओढयाकाठालगत राहणाऱ्या नागरीकांनी सतर्क रहावे तसेच सखल भागात वास्‍तव्‍यास असलेल्‍या नागरीकानी सुरक्षीत स्‍थळी आश्रय घ्‍यावा अशा सुचना प्रशासनाच्‍या वतीने देण्‍यात आल्‍या आहेत.

तालुक्‍यात नदी नाल्‍यावरील पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल आलांडू नये तसेच पुर पाहण्‍यास गर्दी करु नये असे सुचित करण्‍यात आले आहे. जुनाट किंवा मोडकळीस आलेल्‍या ईमारतीत आश्रय घेवू नये त्‍या प्रमाणेच डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहणाऱ्या नागरीकांनी दक्षता घ्‍यावी कारण अतिव्रष्‍टीमुळे भुसख्‍खलन होण्‍याची व दरड कोसळण्‍याची शक्‍यता असते तरी नागरीकांनी सुरक्षीतस्‍थळी आश्रय घ्‍यावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

धरणातील पाण्‍याचा होत असलेला विसर्ग आणि सतत कोसळणारा पाउस यामुळे नदी पाञातील पाण्‍याच्‍या पातळीत वाढ होत आहे. वर्धा नदीतील पाण्‍याची पातळी वाढल्‍यामुळे पटाळा पुलावरुन पाणी वाहताहेत. यामुळे नदीकाठावरील गावातील नागरीकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.

वर्धा व पैनगंगा नदीच्‍या पाञात पाण्‍याची पातळी वाढली तर जुगाद या गावाला पुराचा फटका बसू शकतो. पुर परिस्थिती निर्माण झाल्‍यास प्रशासन दक्ष आहे तसेच आपत्‍ती निवारण पथक व आरोग्‍य व्‍यवस्‍था कार्यान्वित करण्‍यात आली आहे.
वणी: बातमीदार