Home Breaking News जिल्ह्यातील Crime update | गोठ्यातील बैल लंपास, स्प्रिंक्लर चोरट्यांनी लांबविले, दुचाकी पळविली…

जिल्ह्यातील Crime update | गोठ्यातील बैल लंपास, स्प्रिंक्लर चोरट्यांनी लांबविले, दुचाकी पळविली…

उमरखेड | शेतातील गोठ्यात बांधून असलेला बैल मालवाहू वाहनात डांबून लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान घडली.

मोहंमद साकीर शेख लाला (34) रा. सानकवाडी, असे आरोपीचे नाव आहे. त्याने साथीदाराच्या मदतीने मालवाहू वाहन क्रमांक MH-26-AD-9445 मध्ये बैलाला डांबून लंपास केले. याप्रकरणी विशाल शिवाजी शिंदे याच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

स्प्रिंक्लर चोरट्यांनी लांबविले

पांढरकवडा | तालुक्यातील बोरगाव कडू शेतशिवारातून अज्ञात चोरट्याने 11 हजार रुपये किमतीचे स्प्रिंक्लर लांबवल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Img 20250103 Wa0009

आशिष मुरलीधर ठाकरे यांचे बोरगाव कडू शिवारात शेत आहे. शेतात सिंचनासाठी स्प्रिंक्लर लावले होते. त्यातील 11 स्प्रिंक्लर अज्ञात चोरट्याने लांबवले. शेतशिवारात शेतीपयोगी साहित्याची होत असलेल्या चोरीच्या घटनेने शेतकरी चिंतातूर झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी पळविली

यवतमाळ | दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसत आहे. रेल्वे स्टेशनजवळ अंबानगर येथे ठेवण्यात आलेली दुचाकी चोरट्याने पळवली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दीपक देविदास अग्रवाल हे कामानिमित्त रेल्वे स्टेशनजवळ गेले होते. त्यांनी आपली दुचाकी MH- 29-VW- 8194 उभी करून ठेवली होती. ते परत येताच त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली मात्र मिळून आली नाही. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.