Home Breaking News पुरपिडीतांसाठी औषधोपचार व अत्‍यावश्‍यक मदत

पुरपिडीतांसाठी औषधोपचार व अत्‍यावश्‍यक मदत

194

रोटरी, डॉक्टर्स असोसिएशन व क्रांति युवा संघटना यांचा पुढाकार

वणी | तालुक्‍यात आसमानी संकटाने मागील आठवडयात चांगलाच हाहाकार माजवला होता. तब्‍बल 11 गावे पुर्णतः पाण्‍याने वेढली होती, जनजीवन विस्‍कळीत झाले, नागरीकांना स्‍थलांतरीत करावे लागले. आरोग्‍यासोबतच जगण्‍याचा प्रश्‍न उदभवला, पुशूधन संकटात सापडले पिडीतांना सर्वोतोपरी मदत व्‍हावी याकरीता रोटरी, डॉक्टर्स असोसिएशन व क्रांति युवा संघटना सरसावली.

Img 20250422 wa0027

पूर परिस्थितीमुळे अनेकानेक समस्या उद्भवल्या होत्‍या अनेक गावांना पुरांचा फटका बसला. काही गावात पुराचे पाणी शिरले आणि गावांचा संपर्क तुटला होता. यामुळे तेथील नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्‍या पिडीतांवर औषधोपचार त्‍यांना अत्‍यावश्‍यक मदत गरजेची होती. “एक हाक सहकार्याची” याकरीता सामाजीक  संघटना  सरसावल्‍या.

Img 20250103 Wa0009

रोटरी क्लब ऑफ ब्लैक डायमंड सिटी वणी, डॉक्टर्स असोसिएशन व क्रांति युवा संघटनाच्या संयुक्त विद्यमाने पुरग्रस्त गावात डॉक्टर चमु तर्फे आरोग्य शिबिर, औषधी वाटप तसेच पशु चिकित्सकांच्‍या वतीने पशु उपचार आणि औषधोपचार करण्‍यात आले.

आपत्‍ती कोणतीही असो येथील सामाजिक संघटना सहकार्याच्‍या भावनेतुन तत्‍पर असतात. समस्या समोर असताना अशीच “एक हाक सहकार्याची” म्हणून रोटरी क्लब ऑफ ब्लैक डायमंड सिटी वणी, डॉक्टर्स असोसिएशन व क्रांति युवा संघटना यांनी तालुक्‍यात ठिकठिकाणी मदतकार्य केले.

यावेळी निकेत गुप्‍ता, डॉ. महेंद्र लोढा, डॉ. राणे, डॉ. सुरज चौधरी, डॉ. नगराळे. डॉ. गौरकार, डॉ. डाहूले, राकेश खुराणा, निलेश कटारीया, ऍड. सुरज महारतळे, राजु गव्‍हाणे, दिपक मोरे, सुरज मडावी, आशिष आगबत्‍तलवार, अश्‍विनी महाकुलकर यांनी मदतकार्यात सहकार्य केले.
वणीः बातमीदार