● सामाजिक संघटनांनी जपली माणुसकी
वणी: वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवती महिलेच्या प्रसूतीला ‘आधार’ नसल्याने ‘नकार’ दिल्या जातो. ती माऊली तडफडत असताना सामाजिक संघटना माणुसकी जपते आणि आपल्या आरोग्य यंत्रणेचा स्तर किती खालावला याचा प्रत्यय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना येतो. हा दाहक प्रकार नुकताच मारेगाव येथे घडला.
मारेगाव शहरातील एका चौकात भटक्या विमुक्त जमातीतील सोळंके परिवार रस्त्यावर बसून लोखंडी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या परिवारातील अर्चना सोळंके ही नऊ महिन्याची गर्भवती होती. कळा येत असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी नेण्यात आले. त्या माऊली जवळ आधारकार्ड नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चक्क प्रसूती करण्यास नकार दिला.
वेदनेने विव्हळत असलेली ‘ती’ अबला घरी परतली, आता काय करावे असा यक्षप्रश्न ‘त्या’ परिवारासमोर उभा ठाकला. खाजगी रुग्णालयात न्यावं तर पैशाची चणचण, भीक मागण्या शिवाय दुसरा पर्याय त्यांच्या समोर नव्हता. ही बाब जनहित कल्याण संघटना व क्रांती युवा संघटना यांना कळली आणि ‘त्या’ माउलीला मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जनहित कल्याण व क्रांती युवा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘त्या’ गर्भवती महिलेसह थेट वणी गाठली. कुठलाच विलंब न करता येथील लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. नवजात शिशुने गर्भातच शौच केल्याने अंत्यत नाजूक अवस्था होती. मात्र डॉ. महेंद्र लोढा यांनी ती परिस्थिती हाताळत शस्त्रक्रिया केली. सध्यस्थीतीत बाळ व माता सुखरूप आहेत. याप्रसंगी लागणारा संपूर्ण खर्च त्या दोन्ही सामाजिक संघटनांनी उचलला.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राकेश खुराणा, गौरीशंकर खुराणा, ऍड. सुरज महारतळे, विजया कांबळे, समीर कुलमेथे, रॉयल सयद, निलेश तेलंग, प्रफुल ऊरकडे, गौरव आसेकर, धीरज डांगाले, राजू गव्हाणे आदी जनहित कल्याण व क्रांती युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या गर्भवती महिलेच्या मदतीसाठी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार
ही बातमी सुध्दा वाचा….
https://rokhthok.com/2022/08/09/17058