● निधी कमी पडू देणार नाही खा. बाळू धानोरकर यांची ग्वाही
वणी : तालुक्यातील पायाभूत सोयीसुविधांचा विकास करणे गरजेचे आहे. अनेक प्रश्न या भागात प्रलंबित आहेत. मागील दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निधी उपलब्ध होऊ शकला नाही. परंतु आता मात्र सत्ता नसताना देखील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

याप्रसंगी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत चिखलगाव रेल्वे गेट, बस स्टॅन्ड, टिळक चौक ते वरोरा रेल्वे गेट पर्यंत चार पदरी सिमेंट कॉक्रीट रस्ता, नाली आणि पथ दिव्यांचे बांधकाम करण्याकरिता 21 कोटी 15 लक्ष 74 हजार रुपये मंजूर करण्यात आले. शुक्रवार दि. 2 सप्टेंबर ला या कामाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना आवारी, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, झरी तालुका अध्यक्ष आशिष कुलसंगे, डॉ. महेंद्र लोढा, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, सामाजिक कार्यकर्ते बसंत सिंग, प्रवीण काकडे, तेजराज बोडे, बंटी ठाकूर, पालाश बोडे, संजय सपाट यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार