● डिजिटल शिक्षणासाठी तीन स्मार्ट टीव्ही भेट
वणी: नगर परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे व शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी याकरिता यंग मुस्लिम कमेटी सरसावली आहे. दातृत्वाची भावना जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून
42 इंचाचे ती स्मार्ट टिव्ही शनिवार दि. 17 सप्टेंबर ला शाळेच्या स्वाधीन करण्यात आले.
यंग मुस्लिम कमेटी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवितात. नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व त्यांचा शैक्षणिकस्तर सुधारावा याकरिता शाळेला भेटस्वरूपी स्मार्ट टीव्ही देण्याचे कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवले आणि सत्यात उतरवले.
शहरातील दातृत्वाची भावना जपणारे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इझहार शेख, आमेर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक जमीर खान उर्फ जम्मू भाई व जमात-ए-इस्लामी हिंद शाखा यांच्या सहकार्याने 42 इंचाचे 3 स्मार्ट टीव्ही नगर परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील शिक्षक नावेद अहमद शेख आणि जाहीद जनाब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी यंग मुस्लिम कमेटी वणीचे पदाधिकारी इमरान खान मेहबूब खान, आसीम हुसेन, अनवर हयाती, शकील सिद्दीकी, साकिब अहमद खान, शादाब अहमद यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार