Home Breaking News वर्धा नदीपात्रा लगत आढळला मानवी ‘मृतदेह’

वर्धा नदीपात्रा लगत आढळला मानवी ‘मृतदेह’

ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु..

वणी | तालुक्यातील झोला गावाच्या हद्दीतील वर्धा नदीपात्रा लगत मृतदेह आढळला. ही बाब शनिवार दि. 23 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता एका शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी मृतदेहाबाबत पोलीस पाटील यांना सांगितले व पोलिसांना सूचित करण्यात आले. याप्रकरणी पोलीस मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे.

मृतक हा 45 ते 50 वर्ष वयाचा असावा असा कयास वर्तविण्यात येत आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याने बरमुडा व शर्ट परिधान केलेले आहे. वर्धा नदीच्या प्रवाहाने तो वाहून आला असावा असे बोलल्या जात आहे. नदीपात्रा लगत असलेल्या झोला येथील शेतकऱ्याच्या शेताजवळ मृतदेह आढळल्याची वार्ता गावात कळताच गर्दी उसळली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तेथेच उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्या अज्ञात व्यक्तीचा मृत्यू नेमका कसा आणि कशामुळे झाला हे त्याची ओळख पटल्या नंतरच स्पष्ट होणार आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.
वणी : बातमीदार

Img 20250103 Wa0009