● शेवाळकर परिसरात भव्य आयोजन
वणी: शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह आणि जल्लोष असणार आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून बुधवार दि. 28 सप्टेंबर पासून राम शेवाळकर परिसरात मनसे गरबा उत्सवाचा आवाज घुमणार आहे.
कोरोना कालखंडातील दोन वर्षांनंतर यंदाचा नवरात्रोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होत असल्याने सर्वत्र मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. गरबा हा नवरात्रात सादर होणारा एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे. भारतातील गुजरात प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्र काळात विशेषत्वाने खेळला जातो. आता तर संपूर्ण देशात ” दांडिया रास गरबा” ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
तरुणाई ला आकर्षित करणारा हा महोत्सव आहे. नवरात्रोत्सवात ठिक ठिकाणी आयोजन करण्यात येत असते. योग्य नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कटीबद्धता असेल तर तरुणाईची झुंबड उडते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेषत्वाने चोख नियोजन केले आहे. याकरिता मनसेचे शहर अध्यक्ष शिवराज पेचे हे महाराष्ट्र सैनिकांसह परिश्रम घेत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोणतेही आयोजन अभूतपूर्व व उत्साहवर्धक असते. येथील राम शेवाळकर परिसरात भव्य स्वरूपात मनसे गरबा महोत्सव साकारण्यात आला आहे. 5 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या मनसे गरबा महोत्सवात शहरातील प्रत्येक नागरिकांनी उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार