Home Breaking News मनसे गरबा महोत्सवात….‘मारो गरबा घुमतो जाय’ चा धमाल माहोल

मनसे गरबा महोत्सवात….‘मारो गरबा घुमतो जाय’ चा धमाल माहोल

913

सुमधुर संगीत आणि ताल धरणारी तरुणाई

वणी: नवरात्र उत्सवामधील मुख्य आकर्षण असलेल्या रास दांडिया गरबा नृत्याचे खास आकर्षण मनसे गरबा महोत्सव ठरताना दिसत आहे. गुरुवारी राम शेवाळकर परिसरात थाटात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व जेष्ठ विधिज्ञ ऍड. निलेश चौधरी यांनी प्रमुख उपस्थिती होती.

नवरात्रौत्सवाची धूम आता शिगेला पोहोचली आहे. दांडियाला आता उधाण आले आहे. नवरात्रौत्सव मंडळांनीही विविध रंगढंगात दांडिया आणखी व्यापक केला आहे. पूर्वी अत्यंत पारंपरिक पध्दतीने चौकाचौकात खेळल्या जाणार्‍या दांडियाचे स्वरुप गेल्या काही वर्षांत बदलले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील राम शेवाळकर परिसरात गरबा दांडिया नृत्याचे भव्य आयोजन केले आहे.

Img 20250103 Wa0009

कोरोना महामारीनंतर तब्बल तीन वर्षांनी रास दांडिया निर्बंधमुक्त वातावरणात होत असल्याने तरुणाईमध्ये उत्साह संचारला आहे. शहरात ‘दांडिया’मध्ये तरुणाई डोलायला लागली असून, शहरात ‘ढोली तारो ढोल बाजे, पंखिडा… पंखिड…’ अशा विविध गाण्यांवर ‘मारो गरबा घुमतो जाय’चा धमाल माहोल बघायला मिळत आहे.
वणी: बातमीदार