Home Breaking News काय ते उकिरडे, काय ते डुक्करं, समदं ओक्के…!

काय ते उकिरडे, काय ते डुक्करं, समदं ओक्के…!

480

वराहाचा बंदोबस्त करा अन्यथा…
मनसे आक्रमक भूमिकेत

सुनील पाटील | वणी शहरातील प्रत्येक प्रभागात वराहानी हैदोस घातला आहे. ठिकठिकाणी झुंडशाही ने वावरणारे वराह नागरिकांच्या नाकीनऊ आणताना दिसत आहे. वराहाचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा… डुक्करं (वराह) निवासस्थानी तसेच कार्यालयात सोडू असा धमकीवजा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी मुख्याधिकारी याना निवेदनातून दिला आहे.

काय ते उकिरडे, काय ते डुक्करं, समदं ओक्के…! अशी गत शहराची झाली आहे. ठिकठिकाणी निःसंकोचपणे हुंदंडणारे वराह अनेकदा अपघातास कारणीभूत ठरताहेत किंबहुना लहानसहान अपघात नित्याचेच झाले आहे. अपघातग्रस्तांना नागपूर, चंद्रपूर, सेवाग्राम, वर्धा येथे उपचार तथा शत्रक्रिया कराव्या लागल्या आहेत.

शहरात विठ्ठलवाडी, देशमुखवाडी, माळीपूरा, लक्ष्मी नगर, ढुमे नगर, जैन लेआऊट, आनंद नगर, प्रगती नगर, कनकवाडी तसेच शहरात सर्वत्रच वराह मुक्तसंचार करताना दिसतात. सोबतच अनेकांच्या घरात व अंगणात बिनधास्त वावरणाऱ्या वराहामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वछ व सुंदर शहर निर्माण करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. असंच वाराहाचा वावर आणि मुक्तसंचार सुरू राहिल्यास शहराचा उकिरडा व्हायला वेळ लागणार नाही. तरी तातडीने वराहाचा बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनातून केली आहे. अन्यथा मनसे पालिका कार्यालय व मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानी वराह (डुक्कर) सोडण्याचा उपक्रम राबवेल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, माजी नगराध्यक्ष प्रिया लभाणे, महिला शहराध्यक्ष विद्या हिवरकर, ज्योती मेश्राम, शहर उपाध्यक्ष गीतेश वैद्य, लोकेश लडके, गुड्डू धोटे, सारंग चिंचोलकर, वैभव पुराणकर, संकेत पारखी सुरज भिवलकर, अंकित पिदूरकर, भोला चिकनकर यांचेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी : बातमीदार