Home Breaking News खाण पर्यावरण आणि खनिज संवर्धन

खाण पर्यावरण आणि खनिज संवर्धन

71
Img 20241016 Wa0023

मुकूटबन येथे स्वच्छता पंधरवाडा

रोखठोक | इंडियन ब्युरो ऑफ माईन्स च्या वतीने मुकूटबन येथे खाण पर्यावरण आणि खनिज संवर्धन पंधरवाडा उत्साहात साजरा करण्यात आला. कृष्णकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ते 30 नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित कार्यक्रमात मुकुटबन व पिंपरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलेही सहभागी झाली होती. यावेळी कृष्णकुमार राठोड यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित करून सर्व कामगारांना पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. शाळेतील मुलांनी व कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांनी पोस्टर व घोषवाक्य बनवले होते, ज्याची पाहणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली.

खाण पर्यावरण आणि खनिज संवर्धन पंधरवाडा च्या निमित्ताने विविधांगी उपक्रम तसेच पर्यावरणीय जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी मनोज सिंग, अंशुल वाने, वि. आर. स्वामी, विकास सिंगल, अभिजित दत्ता यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

इंडियन ब्युरो ऑफ माईन्स च्या वतीने मुकुटबन लाइमस्टोन ऍण्ड डोलोमाइट ऑफ आर. सी. सी.पी.एल प्रायव्हेट लिमिटेड येथे अतिरिक्त उपाध्यक्ष, आर. सि. सि.पि. एल. प्रायव्हेट लिमिटेड, कृष्णकुमार राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वणी: बातमीदार