● अतिक्रमण करणे भोवले
रोखठोक |- तालुक्यातील शिरपूर या गावातील वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या 44 अतिक्रमण धारकावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. बोमीडवार यांनी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
शिरपूर येथे वन विभागाची वन जमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती सुरू केली होती. वन विभागाने अतिक्रमण करणाऱ्या 58 जणां विरोधात शिरपूर पोलिसात सन 2011 मध्ये तक्रार दाखल केली होती.
शिरपूर पोलिसांनी भा.द.वी कलम 447 नुसार गुन्हा नोंद करून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. या प्रकरणावर दि 3 डिसेंबर ला वणीच्या प्रथम श्रेणी न्यायालयात सुनावणी होऊन निकाल देण्यात आला. यामध्ये 44 अतिक्रमण धारकांना न्यायाधीश एस. एम. बोमीडवार यांनी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक अभियोक्ता प्रविण कन्नलवार यांनी बाजू मांडली.
वणी : बातमीदार