Home Breaking News गाळे लिलाव प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती

गाळे लिलाव प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती

2010

व्यापाऱ्यांना मिळाला दिलासा

रोखठोक | गांधी चौकात नगर परिषदेच्या मालकीचे 160 दुकान गाळे आहेत. संपूर्ण गाळ्यांचा नव्याने लिलाव करावा असे आदेश जनहित याचिकेवर न्यायालयाने दिले होते. पालिका प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली असतानाच व्यापारी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

न्यायालयाने गांधी चौकातील 160 दुकान गाळे लिलाव करण्याचे आदेश नगर रचना विभागाला दिले होते. त्या नुसार नगर परिषद प्रशासनाने लिलाव प्रक्रिया आरंभली होती. लिलाव प्रक्रिया सुरू असतानाच येथील व्यापाऱ्यांनी 21 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2022 रोजी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून लिलाव प्रक्रियेवर स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देण्यास नकार दिला.

न्यायालयाच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशा मावळल्या होत्या. तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा विचार असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला देत पुनर्याचिका दाखल करण्यात आली. यावर न्यायालयाने गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यात पुन्हा आशा निर्माण झाली आहे.
वणी: बातमीदार