Home Breaking News रोजगार द्या अन्‍यथा खानबंद व चक्‍काजाम

रोजगार द्या अन्‍यथा खानबंद व चक्‍काजाम

288
C1 20240924 20095263

संजय खाडे यांचा आंदोलनाचा इशारा

रोखठोक | वेकोलीच्‍या वणी उत्‍तर व वणी एरीया मधील कोळसा खाणीच्‍या अधिनस्‍त कार्यरत खाजगी कंपन्‍यात स्‍थानिक भुमीपुञांना रोजगार दयावा या मागणीचे निवेदन देण्‍यात आले. प्रकल्‍पबाधीत बेरोजगार भुमीपुञांवर होत असलेला अन्‍याय कदापीही सहन केल्‍या जाणार नाही. तातडीने निर्णय घ्‍यावा अन्‍यथा खानबंद व चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात येईल असा इशारा उकणीचे माजी सरपंच संजय खाडे यांनी दिला आहे.

वेकोली प्रशासनाने वणी उत्‍तर क्षेञ व वणी एरियातील उकणी ओपनकास्ट माईन तसेच निलजई ओपनकास्ट माईन या कोळसा खाणीमध्ये कोळसा काढणे व डंपिंग करण्यासाठी 90 टक्‍के जमिन संपादित केली आहे. यामुळे शेती हा पारंपारिक व्यवसाय पुर्णताः बंद झाला आहे. करीता परिसरातील भुमीपुञ बेरोजगार झाला आहे. रोजगारा अभावी ते वाम मार्गाला लागत आहे.

वेकोलीच्‍या अधिनस्‍त कार्यरत खाजगी कंपन्‍यामध्‍ये प्रकर्शाने स्‍थानिक कुशल, अकुशल बेरोजगार युवकांना 80 टक्‍के प्राधान्‍य देणे अपेक्षीत असतांना भुमीपुञांवर सातत्‍याने अन्‍याय होत आहे. पिंपळगाव, जुनाडा,  बोरगांव, कोलेरा, पिंपरी, निळापुर ब्राम्हणी, लाठी, बेसा, निवली,  तरोडा,  निलजई,  बेलोरा, मुंगोली या परिसरातील किमान 200 बेरोजगार तरुणांना कोळसा खाणीमध्ये  कार्यरत खाजगी कंपन्यात रोजगार देण्‍यात यावा.

उकणी गावातील व परिसरातील ज्या युवकांजवळ हेवी ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांना आपल्या कंपनीमध्ये डायव्हर म्हूणन नौकरी देण्यात यावी तसेच ज्यांच्याकडे हेवी लायसन्स असून सुध्दा वॉल्वो ट्रक्स चालवता येत नाही. अशांना आपल्या कंपनीमार्फत कमीतकमी स्वतंत्र कॅम्प घेउन त्या परिसरातील लायसन्स धारक युवकांना ट्रेनिंग देउन पारांगत करावे व चालक म्‍हणुन समावून घ्‍यावे. अशा मागण्‍या रेटून धरण्यात आल्या आहेत. तातडीने निर्णय घ्‍यावा अन्‍यथा 21 डिसेंबर ला कोणतीही पुर्वसुचना न देता खानबंद व चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात येईल असा इशारा देण्‍यात आला आहे.

याप्रसंगी संजय खाडे माजी सरपंच उकणी, नारायण मांडवकर, विलास शेरकी, प्रा. टोंगे, बाळासाहेब राजुरकर, राजु धाडे, विठ्ठल खोब्रागडे, निकेश निब्रड, शुभम चिंचोलकर, देविदास चिंचोलकर, जिवन मजगवळी, नत्त्थु पारशिवे, सुधाकर दर्वेकर, अशोक रजपुत, रविंद्र जुनगरी, पांडुरंग धांडे, अविनाश मोडक, विजय लोखंडे, बाळा शिंदे, प्रविण डोंगे, संतोष धांडे मनोज खाडे आदी उपस्थित होते.
वणीः बातमीदार