● ह्युमन सोशल डेव्हलपमेंटने केले सन्मानित
रोखठोक | लोकमान्य टिळक महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख व रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.निलीमा विजयराव दवणे यांना शिक्षण क्षेत्रातील योगदाना बद्दल राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रीय मानवधिकार कमीशन संलग्नीत ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक, राजनैतिक, आर्थिक, न्याय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

पिपंरी गुरव पुणे येथे दिमाखदार पुरस्कार सोहळा निळू फुले नाट्य सभागृहात संपन्न झाला. आयोजित कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाधिकारी ई. झेड खोब्रागडे तर जीवन गौरव पुरस्कार्थी सिनेअभिनेते अनंत जोग, यशदाचे संशोधन अधिकारी बबन जोगदंडे, लिज्जत पापडचे संचालक सुरेश खोत तर ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन चे अध्यक्ष कैलास बनसोडे यांची उपस्थिती होती.
डॉ.निलीमा दवणे यांचे समाजशास्त्र या विषयाचे पुस्तके प्रकाशित असून त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित आहे. त्या वक्त्या असून विविध विषयावर व्याख्याने दिले आहेत. ते रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांनी समाज उत्थानाकरीता अनेक उपक्रम राबविले आहेत. या संपूर्ण योगदाना मुळेच त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शि.प्र.मं चे अध्यक्ष नरेन्द्र नगरवाला, उपाध्यक्ष रमेश बोहरा, सचिव अँड लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के व समस्त संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे, प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
वणीः बातमीदार